-
अभिनेत्री जुही चावला ही ९० च्या दशकातली सुपरहिट अभिनेत्री आहे. तिने हम है राही प्यार के, इश्क, कायमत से कयामत तक, डर, येस बॉस सारख्या अनेक सिनेमांत काम केलंय. (फोटो सौजन्य-जुही चावला, फेसबुक पेज)
-
जुहीने नंतर गुलाब गँग सिनेमातही काम केलं. तसंच दिवारे या सिनेमातही दिसली होती. आता ओटीटीवरच्या हश हश या वेबसीरिजमध्येही तिने यशस्वी पदार्पण केलं.
-
जुही चावला आत्ताच नेटफ्लिक्सवर आलेल्या फ्राय डे नाईट प्लान या सिनेमातही आहे. तिची जादू आजही कायम आहे.
-
जुहीप्रमाणेच सुश्मितानेही एकाहून एक सुपरहिट सिनेमांत काम केलंय. (फोटो सौजन्य-सुश्मिता सेन, फेसबुक )
-
सुश्मिता ही मिस युनिव्हर्स ठरली होती. त्यानंतर तिने अनेक सिनेमात काम केलं. आता ती ताली या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. तसंच त्याआधी आलेली आर्या ही सीरीजही गाजली.
-
अभिनेत्री रविना टंडननेही एकाहून एक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. मोहरा, लाडला, दिलवाले, दुल्हे राजा यांसारख्या सिनेमातून तिने अनिल कपूर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, गोविंदा यांच्यासह काम केलंय. (फोटो सौजन्य-रविना टंडन फेसबुक पेज)
-
रविना टंडनने आरण्यक या वेबसीरिजमधून पदार्पण केलं. ही सीरिज हिट ठरली होती.
-
काजोलही तिच्या काळातली गाजलेली अभिनेत्री आहे. करण अर्जुन, कुछ कुछ होता है, हलचल, बाझीगर या सिनेमांतून काजोलने काम केलंय. (फोटो सौजन्य-काजोल-फेसबुक पेज)
-
काजोलची जोडी शाहरुखसह हिट ठरली. तसंच तिने अजय देवगणसहही अनेक सिनेमांत काम केलंंय. या दोघांनी लग्नही केलं.
-
काजोलने द ट्रायल या वेबसीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं.
-
माधुरी दीक्षितने अबोध या सिनेमातून पदार्पण केलं. तिचा तेजाब हिट झाला आणि मग तिने मागे वळून पाहिलंच नाही. (फोटो सौजन्य-माधुरी दीक्षित, फेसबुक पेज)
-
माधुरी दीक्षितने लग्न केलं त्यानंतर आजा नच ले या सिनेमातून कमबॅक केलं. तसंच बकेट लिस्ट नावाचा एक मराठी सिनेमाही केला.
-
माधुरी दीक्षितने नेटफ्लिक्सवरच्या द फेम गेम या वेब सीरिजमध्ये काम केलं. ही वेब सीरिज हिट ठरली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”