-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे चिन्मय मांडलेकर.
-
चिन्मयने मराठीबरोबर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
चिन्मय फक्त उत्कृष्ट अभिनेता नसून तो लेखक, दिग्दर्शक, निर्मिता देखील आहे.
-
अशा या हरहुन्नरी अभिनेत्याला मात्र काही काळापूर्वी सुबोध भावेमुळे सात महिने घरी बसाव लागलं होतं.
-
चिन्मयनं हा किस्सा अलीकडेच ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेल मुलाखती दरम्यान सांगितला होता.
-
चिन्मय एनएसडी करून मुंबईत ठरवून आला होता की, फक्त चित्रपट करणार, टेलिव्हिजन करणार नाही.
-
पण मुंबईत आल्यानंतर त्याला कळालं की, मराठी अभिनेता, अभिनेत्री जे कुठंतरी आधी नोकरी करून मग नाटक करायचे किंवा जुजबी चित्रपट करायचे. त्यांच्यासाठी एक नवीन उद्योग क्षेत्र जन्माला आलं आहे, ते म्हणजे मालिका.
-
जेव्हा चिन्मय एनएसडीला गेला होता, तेव्हा मराठी मालिका क्षेत्र एवढं मोठं झालं नव्हतं. फक्त ‘आभाळमाया’ मालिका सुरू झाली होती. त्यामुळे त्याने ‘आभाळमाया’ मालिका कधी पाहिलीच नाही, असं सांगितलं.
-
पुढे चिन्मयनं सांगितलं की, “मी जेव्हा एनएसडीमधून परत आलो तेव्हा ‘आभाळमाया’ मालिकेचं दुसरं पर्व संपलं होतं. या मधल्या तीन वर्षात पुलाखालून खूप पाणी गेलं होतं आणि मराठी कलाकार रोज उठून शूटिंगला जायला लागले होते.हे मला एनएसडीमधून आल्यानंतर पहिल्या चार-पाच दिवसांत कळालं होतं.”
-
मग चिन्मयला रिअॅलिटी चेक झाल्यानंतर त्याने निर्णय बदलला. जे मिळेल ते काम करायचं असं त्याने ठरवलं.
-
यावेळी ‘वादळवाट’ नावाची मालिका आली होती. तेव्हा चिन्मयच्या मित्राने त्याला या मालिकेसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला होता.
-
त्याप्रमाणे चिन्मय ऑडिशन देऊन आला. त्याची निवड झाली अन् त्याला सांगण्यात आलं की, ‘सुबोध भावे नावाचे एक अभिनेते आहेत, त्यांच्याबरोबर तुमचा ट्रॅक आहे.’
-
पण याकाळात सुबोध भावे कोण हे चिन्मयला माहित नव्हतं. त्यामुळे चिन्मयनं संबंधित व्यक्तीला विचारलं की, “कधी सुरू होणार?” तर ते म्हणाले, ‘होईल सुरू.’
-
चिन्मयनं सांगितलं की, “तेव्हा सुबोध भावे खूप व्यस्त होता. एकावेळेला चार मालिका करत होता. ‘वादळवाट’, ‘जगावेगळी’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि ‘अवंतिका’ अशा चार मालिका करून चित्रपट आणि नाटकही करत होता. त्यामुळे सुबोधकडे तारखा नव्हता.”
-
मालिकेसाठी चिन्मयची निवड झाली होती. पण सुबोध भावेकडे तारखा नसल्यामुळे ती गोष्ट रखडली होती. यामुळे चिन्मयला घरी बसाव लागलं होतं.
-
चिन्मय सांगितलं की, “मला अजूनही आठवतंय, ३ सप्टेंबर गणेश चतुर्थी होती. मला पहिला फोन आला की, तुमची निवड झालीये. तेव्हा मी खूप आनंदी होतो. आणि साधारण, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे सात महिने मी घरी बसून होतो. कारण सुबोध भावेकडे तारखा नव्हत्या.”
-
“बरं निवड झाली होती, भूमिका चांगली होती. ‘वादळवाट’ ज्यांची पहिली मालिका होती, त्यांच्याकडून करार करून घेतला होता की, दुसरं काही काम करणार नाही. त्यामुळे मी वाटत पाहत राहिलो.” असं चिन्मयनं सांगितलं.
-
दरम्यान, चिन्मयनं सांगितलेला हा किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख