-
‘द कपिल शर्मा शो’ हा भारतातील सर्वात प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमांपैकी एक आहे. हा एक प्रकारचा टॉक शो देखील आहे जिथे कपिल बॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींशी संवाद साधताना दिसतो. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे आतापर्यंत पाच सीझन झाले आहेत. पाचव्या सीझनचा शेवटचा एपिसोड २३ जुलै रोजी प्रसारित झाला. हा कार्यक्रमां ऑफ एअर झाल्यानंतर (बंद झाल्यानंतर) काही कलाकार अमेरिकेला गेले आहेत. कपिलने त्याच्या टीमसोबत अमेरिकेत काही विनोदी कार्यक्रम केले. हे कार्यक्रम हाऊसफुल्ल झाले. याचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले होत. पण तिथून परतल्यावर तो काय करतोय? तसेच इतर कलाकार काय करत आहेत? असे प्रश्न या शोच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. कार्यक्रम बंद झाल्यानंतर किकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदू आणि बाकीच्या काही कलाकारांनी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे कलाकार सध्या कोणतं काम करत आहेत. (फोटो : @kapilsharma/instagram)
-
कपिल शर्मा : शो बंद झाल्यानंतर कपिल शर्मा एका नवीन प्रोजेक्टवर काम करत असून तो सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलिकडेच तो अर्चना पूरण सिंगबरोबर आयुर्वेदिक उपचारांसाठी बंगळुरूला गेला होता. यानंतर तो पंजाबलाही जाऊन आला. (फोटो : @kapilsharma/instagram)
-
कृष्णा अभिषेक : कृष्णा अभिषेक अलिकडेच डिझायनर नीता लुल्लाच्या फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून दिसला होता. तसेच कृष्णा ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसला होता. (फोटो : @krushna30/instagram)
-
किकू शारदा : अक्षय कुमार स्टारर ‘वेलकम टू द जंगल’च्या टीझरमध्ये किकू शारदाही दिसला आहे. किकी या चित्रपटात धमाल कॉमेडी करताना दिसेल. (PC : Still From Film)
-
सुमोना चक्रवर्ती : सुमोना चक्रवर्ती सध्या विश्रांती घेत आहे. शो ऑफ एअर झाल्यानंतर अभिनेत्रीने १० दिवसांचा विपश्यना कोर्स सुरू केला होता. (फोटो : @sumonachakravarti/instagram)
-
अर्चना पूरण सिंग : अर्चना पूरण सिंगने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बंगळुरूतल्या डोंगरांमध्ये फिरताना दिसत आहे. ती काही दिवसांसाठी येथे आयुर्वेदिक उपचारांसाठी गेली होती. (स्रोत: @archanapuransingh/instagram)
-
चंदन प्रभाकर : कपिलच्या कार्यक्रमात चंदू चहावाला हू भूमिका साकारणारा चंदन प्रभाकर सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. तो आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. (फोटो : @chandanprabhakar/instagram)

Transshipment Facility : बांगलादेशची चीनशी जवळीक, भारतानं घेतला मोठा निर्णय; ‘ही’ सुविधा केली पूर्णपणे बंद!