-
Shabana Azmi Birthday : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. उत्कृष्ट अभिनय आणि स्पष्टवक्तेपणा या दोन गोष्टींसाठी शबाना आझमी ओळखल्या जातात. आपल्या अभिनयाच्या जोरावर शबाना यांनी जेवढं नाव कमावलं, तितकीच चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही होत असते. (PC : @azmishabana18/instagram)
-
शबाना आझमी यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या लेखक जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं आहे. शबाना आणि जावेद अख्तर यांची प्रेमकहाणी त्यांच्या घरातूनच सुरू झाली होती. (PC : @azmishabana18/instagram)
-
शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी हे प्रसिद्ध कवी होते. त्यामुळे त्यांच्या घरी अनेकदा कवी-लेखकांच्या मैफिली रंगायच्या. (PC : @azmishabana18/instagram)
-
शबानाही अनेकदा आईबरोबर वडिलांच्या मैफिलींना जायच्या. यादरम्यान जावेद अख्तर यांच्याशी शबाना आझमी यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. (PC : @azmishabana18/instagram)
-
शबाना आणि जावेद अख्तर भेटले तेव्हा जावेद अख्तर हे विवाहीत होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना फरहान आणि झोया ही दोन मुलंदेखील होती. तरीदेखील जावेद अख्तर यांनी शबाना आझमी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (PC : @azmishabana18/instagram)
-
शबाना यांच्या आई-वडिलांना वाटत होतं की त्यांच्या मुलीने दुसऱ्या महिलेचा संसार मोडून स्वतःचा संसार थाटू नये. परंतु शबाना आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यानंतर जावेद अख्तर यांनी त्यांची पत्नी हनी इराणी यांच्याशी घटस्फोट घेतला आणि १९८४ मध्ये शबाना आझमींशी लग्न केलं. (PC : @azmishabana18/instagram)
-
शबाना आझमींच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुर’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटांमधील उत्कृष्ट कामासाठी शबाना आझमी यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. (PC : @azmishabana18/instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख