-
सुनिधी चौहान ही संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका आहे.
-
तिने केवळ हिंदीच नाही तर मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, पंजाबी, आसामी, नेपाळी आणि उर्दू भाषेतील अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
-
सुनिधी तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.
-
एका मुलाखतीत गायकाने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांबद्दल सांगितले.
-
माझ्या आई-वडिलांनीही मला यातून बाहेर येण्यास मदत केली, असं ती म्हणाली.
-
सुनिधीने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितलं की २००२ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तिने कोरिओग्राफर बॉबी खानशी लग्न केलं होतं. कामादरम्यान दोघांची भेट झाली.
-
सुनिधी आणि बॉबीने मिळून ‘पहला नशा’ हा अल्बम लॉन्च केला, येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.
-
यानंतर सुनिधीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन बॉबी खानशी गुपचूप लग्न केले.
-
या लग्नामुळे सुनिधी आणि तिच्या आई-वडिलांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
-
दुसरीकडे, हळूहळू सुनिधी आणि बॉबीच्या नात्यात दुरावा येऊ लागला आणि वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
-
सुनिधी तिच्या अयशस्वी लग्नाबद्दल म्हणाली, “माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण मी त्यांची आभारी आहे कारण मी जी काही आहे ती याच चुकांमुळे आहे.”
-
“जर त्या चुका नसत्या झाल्या तर माझं आयुष्य खूप कंटाळवाणं असतं आणि मी आयुष्यातील चांगल्या गोष्टींपासून वंचित राहिले असते.”
-
बॉबी खानशी मोडलेल्या लग्नाबद्दल सुनिधी म्हणाली की माझे लग्न झाले होते तेव्हाही माझा चांगला वेळ जात होता.
-
“मला माहीत होते की मी चुकीच्या ठिकाणी होते, पण मला हे देखील माहीत होते की चुकीची वेळ जास्त काळ टिकणार नाही,” असं सुनिधी म्हणाली.
-
ती पुढे म्हणाली, “माझं लग्न मोडून बरीच वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षानंतरही, जर कोणी त्याबद्दल बोलले, तर त्या लग्नामुळे मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत झाली आहे, असं मला वाटतं.”
-
सुनिधी म्हणाली, “मी या सर्व समस्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. या गोष्टी मला त्रास देत नाहीत. या सर्व अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे. मला माझ्या आईवडिलांनीही मला यातून बाहेर येण्यास मदत केली.”
-
बॉबीपासून घटस्फोट घेतल्यानंतर ९ वर्षांनी सुनिधीने २०१२ मध्ये संगीतकार हितेश सोनिकशी लग्न केले. २०१८ मध्ये सुनिधी आणि हितेश मुलगा तेगचे पालक झाले.
-
सुनिधी पती आणि मुलासोबत आनंदी जीवन जगत आहे. (सर्व फोटो – @sunidhichauhan5/instagram)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं