-
बॉलीवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खानचा आज वाढदिवस आहे.
-
करिश्माई सौंदर्य, सहज अभिनय आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे सदैव चर्चेत राहणारी करीना आज ४३ वर्षांची झाली.
-
करीनाचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य कपूर कुटुंबात झाला.
-
करीना रणधीर व बबीता यांची धाकटी लेक तर अभिनेत्री करिश्मा कपूरची बहीण.
-
कौटुंबिक पार्श्वभूमी चित्रपटांची असल्याने करीनाही याच क्षेत्रात आली. करीनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शिक्षणांबद्दल जाणून घेऊयात.
-
करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी शाळा व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.
-
पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली.
-
मिठीबाई कॉलेजमध्ये दोन वर्षे कॉमर्सचा अभ्यास केल्यानंतर ती युनायटेड स्टेट्समधील हार्वर्ड समर स्कूलमध्ये मायक्रो कॉम्प्युटरच्या तीन महिन्यांच्या कोर्ससाठी गेली.
-
यातच तिला कायद्याची आवड निर्माण झाली आणि तिने मुंबईच्या गव्हर्नमेंट कॉलेमध्ये प्रवेश घेतला.
-
पण पहिले वर्ष पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं.
-
त्यासाठी शिक्षण सोडून तिने मुंबईतील एका अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला.
-
अॅक्टिंग शिकत असतानाच तिला २००० मध्ये तिला ‘कहो ना…प्यार है’ चित्रपट मिळाला.
-
काही कारणाने तिने तो चित्रपट केला नाही, नंतर तिने अभिषेक बच्चनबरोबर रेफ्युजी चित्रपटातून त्याच वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
करीना कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
-
(सर्व फोटो – करीना कपूर खानच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”