-
अभिनेता अमेय वाघ याने मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल अपडेट्स देत असतो.
-
तर आता सर्वत्र अमेय वाघ याच्या घरी बाप्पासाठी केलेली सजावट चर्चेत आली आहे.
-
आई-वडिलांना केदारनाथला जाता आलं नाही म्हणून त्याने चक्क गणपतीसाठी केदारनाथचा देखावा तयार केला आहे.
-
अमेयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने त्याच्या घरी गणपती बाप्पासाठी बनवलेल्या या केदारनाथच्या देखाव्याची झलक चाहत्यांना दाखवली.
-
त्याने लिहिलं, “माझ्या आई बाबांना काही कारणामुळे ‘केदारनाथ’ ला जाता आलं नाही म्हणून आमच्या महेश काकांनी तोच देखावा घरी तयार केला!”
-
पुढे त्याने लिहिलं, “आता गणपती थाटामाटात बसले आहेत! गणपती बाप्पा मोरया.”
-
तर आता त्याच्या घरच्या गणपतीचा हा देखावा खूप चर्चेत आला आहे.
-
त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याचे चाहते हा देखावा खूप आवडल्याचंही सांगत आहेत.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर