-
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
-
२४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथील ‘द लीला पॅलेस’मध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही लग्नसोहळा संपन्न होणार आहे.
-
तर आता त्यांच्या विवाह स्थळाची सर्वत्र चर्चा रंगली असून त्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
-
परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी उदयपूरचे सितारा हॉटेल बुक केलं आहे. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम लीला पॅलेस आणि उदयविलास हॉटेलमध्ये होणार आहेत.
-
तर त्यांच्या असून पाहुण्यांची राहण्याची सोयाही याच हॉटेलमध्ये केली आहे.
-
‘द लीला पॅलेस’ हे जगातील १०० बेस्ट आणि भारतातील टॉप ५ मध्ये येणाऱ्या हॉटेल्सपैकी एक आहे.
-
या हॉटेलला न्यू यॉर्कच्या ट्रॅव्हल मॅग्झिनने २०१९ मध्ये जगातील १०० बेस्ट हॉटेल्सच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलं आहे.
-
या हॉटेलला चारही बाजूंनी पर्वतरागांनी आणि तलावांनी वेढलेलं आहे. तर या पॅलेसमधून बाहेरचं दृष्यही विलक्षण दिसतं.
-
त्याबरोबरच या हॉटेल मधून ताज पॅलेस, सिटी पॅलेस आणि आरावली हिल्स दिसतात.
-
या हॉटेलच्या प्रत्येक खोलीतून फार मोहक व्ह्यू आहे.
-
या हॉटेलमधील डायनिंग एरियाही खूप अंकेशक आहे.
-
याबरोबरच इथे येणाऱ्या पाहुण्यांना चालण्यासाठी बरीच मोकळी जागा आहे.
-
द लीला पॅलेसमध्ये परिणीती आणि राघवसाठी महाराजा सुट बुक करण्यात आला आहे.
-
३६०० स्क्वेअर फुटच्या या खोलीला लेकचा व्ह्यू आहे. या आलिशान खोलीचं २४ तासांचं भाडं तब्बल १० लाख आहे.
-
या ठिकाणी लग्न करण्यासाठी राघव आणि परिणीती यांनी कोटींवधींचा खर्च केला आहे.
“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन