-
आपल्या नृत्य कौशल्याने आणि कातिल अदाने गौतमी पाटीलनं महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं आहे. (फोटो सौजन्य – रोहित जाधव)
-
फक्त पुरुष मंडळी नाही तर महिला देखील गौतमीच्या चाहत्या आहेत. (फोटो सौजन्य – अनिकेत झरेकर)
-
गौतमीच्या काही कार्यक्रमांना महिला देखील पाहायला मिळाल्या होत्या. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
अशी ही महाराष्ट्रातील अनेकांची मनं जिंकणारी गौतमी अलीकडेच ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’वर सहभागी झाली होती. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
या ‘माझा कट्टा’वर तिनं असा एक प्रसंग सांगितला, ज्यावेळी तिथली परिस्थिती तिला हाताळणं अवघड झालं होतं. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
एका ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम होता. पण तिथे त्यांना रुम देखील नव्हत्या. ओपन स्टेज होता. तिथे कोणीही नव्हतं, फक्त प्रेक्षक होते. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
गौतमीचा कार्यक्रम असल्यामुळे तिथे प्रचंड संख्येनं लोकं जमली होती. अशात सुरक्षा रक्षक कमी अन् जे ठरवलेले सुरक्षा रक्षक होते, ते विचित्र निघाले. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
त्या सुरक्षा रक्षकांनी गौतमीच्या टीमलाच त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना वाचवण्याच्या ऐवजी सुरक्षा रक्षक त्रास देऊ लागेल. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
पण सुदैवाने गौतमी इतर मुलींबरोबर सुखरूप बाहेर पडली. यावेळी तिथल्या आयोजनकांची गौतमीसह तिच्याबरोबर असलेल्या मुलींना हात धरून गाडीत बसवलं. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
हा प्रसंग सांगत गौतमी शेवटी म्हणाली की, “तिथली लोकं खूप भयानक होती. यापुढे तसे सुरक्षा रक्षक अजिबात नको. आता त्या ठिकाणी कार्यक्रम असेल तर ते सुरक्षा रक्षक आहेत का? याची विचारपूस मी पहिली करून घेते.” (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, लवकरच गौतमी एका चित्रपटात झळकणार आहे. कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडणारा चित्रपट असणार आहे. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
-
‘घुंगरू’ असं गौतमीच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. (फोटो सौजन्य – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”