-
बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आज ज्या यशाच्या शिखरावर विराजमान आहेत ते पाहता ते कधी मुंबईतील तीन बत्ती चाळीतील एका छोट्याशा खोलीत राहिले आहेत यावर कोणाचाच पटकन विश्वास बसणार नाही.
-
जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांनी आयुष्यातील ३० वर्षे त्या चाळीत घालवली. नुकतंच त्यांनी या चाळीला भेट दिली व आपल्या जुन्या आठवणींना उजाळाही दिला.
-
जॅकी श्रॉफ यांचे कुटुंब एकेकाळी प्रचंड आर्थिक अडचणीत होते, पण आज हा अभिनेता करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. एवढेच नाही तर त्यांनी आपला मुलाला टायगर श्रॉफलाही आज स्टार बनवला आहे.
-
आज भलेही जॅकी श्रॉफ हे सेलिब्रिटी असले तरी आपल्या चाळीतील दिवसांची त्यांना अजूनही जाण आहे.
-
तीन बत्ती चाळीतील हा एक सर्वसामान्य मुलगा बॉलिवूडचा स्टार अन् प्रेक्षकांचा लाडका जग्गू दादा कसा बनला याची कथा खूप प्रेरणादायी आहे.
-
जॅकी श्रॉफ यांच्या वडिलांचे नाव काकूभाई श्रॉफ होते, ते ज्योतिषी होते. तर आई रिटा कझाकिस्तानची होती. असे म्हटले जाते की तिथे सत्तापालट झाल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची आई अनेक वर्षांपूर्वी कझाकिस्तानमधून लाहोरला पळून आली होती.
-
भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान ती मुंबईत आली अन् तीन बत्ती चाळीतील काकूभाई यांच्याशी तिची ओळख झाली.
-
काकूभाई श्रॉफ हे ज्योतिषी तर होतेच, पण शेअर मार्केटचे प्रसिद्ध शेअरहोल्डरदेखील होते. यामध्येच एकेदिवशी त्यांचे सगळे पैसे बुडाले आणि त्यांचं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं.
-
लग्नानंतर काकू भाई आणि रिटा यांनी दोन मुलांना जन्म दिला, त्यातील धाकट्याचे नाव जॅकी श्रॉफ होते. जॅकी श्रॉफ यांनी तीन बत्ती चाळीमध्ये बरीच वर्षे घालवली.
-
आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी लहानसा जॅकी कधी शेंगदाणे विकत असे तर कधी चित्रपटगृहाबाहेर पोस्टर चिकटवायचे काम करत असे. जॅकी यांनी ११ वी पर्यंत जेमतेम शिक्षण घेतलं नंतर मात्र आर्थिक तंगीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही.
-
घराला हातभार लावण्यासाठी जॅकी श्रॉफ यांनी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एके दिवशी ते बसस्थानकावर उभे असताना कोणीतरी त्यांना फोटो काढण्यास सांगितले. यासाठी पैसे मिळतील असेही सांगितले. जॅकी श्रॉफ यांना ही कल्पनाच फार वेगळी वाटली, त्यांना प्रचंड आनंद झाला.
-
नंतर त्यांच्या लक्षात आले की ते फोटो एका जाहिरात एजन्सीने घेतले होते आणि अशा रीतीने जॅकी यांची मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री झाली. मॉडेलिंगच्या त्या पहिल्या कामासाठी जॅकी श्रॉफ यांना ७,००० रुपये मिळाले होते. यानंतर त्यांनी नोकरी सोडून मॉडेलिंग करायला सुरुवात केली.
-
दरम्यान, देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद याच्याशी त्यांची मैत्री झाली. जॅकी श्रॉफ यांना भेटल्यानंतर देव आनंद खूप प्रभावित झाले आणि जॅकी यांना त्यांच्या चित्रपटात सहाय्यक भूमिका दिली.
-
सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटात जॅकी श्रॉफ यांना मुख्य भूमिका मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि जॅकी श्रॉफ हे रातोरात स्टार झाले, त्यानंतर जॅकी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
-
जॅकी श्रॉफ यांनी चार दशकांपेक्षा अधिक कारकिर्दीत १३ भाषांमध्ये २२० हून अधिक चित्रपट केले आहेत. नुकतंच जॅकी यांनी रजनीकांत यांच्या सुपरहीट ‘जेलर’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य : जॅकी श्रॉफ / फेसबुक पेज)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास