-
‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो.
-
आपल्या अभिनयाने शशांकने मनोरंजनसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
-
सध्या तो ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
अशा या लोकप्रिय अभिनेत्याने यंदा बाप्पाकडे स्वतःसाठी नाही तर लेकासाठी एक मागणी केली.
-
‘तारांगण’ या एंटरटेन्मेंट मीडियाशी संवाद साधताना शशांकनं लाडक्या बाप्पाकडे एक मागणी केली आहे.
-
“मी यंदा गणरायाकडे वेळ मागेन. कारण मला आता ऋग्वेदला वेळ देता येत नाहीये. मला यामुळे कसंतरी होतं असतं,” असं शशांक म्हणाला.
-
पुढे शशांक म्हणाला की, “जेव्हा मी सकाळी निघतो तेव्हा तो झोपलेला असतो आणि जेव्हा घरी परतो तेव्हा देखील तो झोपलेला असतो. जे आपण अनेक गोष्टी आणि गाण्यांमध्ये ऐकतो, तसं माझ्याबरोबर होतंय. त्यामुळे मी बाप्पाकडे वेळ मागेन जो मला माझ्या मुलासाठी द्यायचा आहे.
-
शशांकनं लेका व्यतिरिक्त सगळ्यांसाठी स्वास्थ, सगळीकडे स्वच्छता, शांतता नांदू दे अशी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे.
-
दरम्यान, आता शशांकनं हिंदी सिनेसृष्टीतही पाऊल ठेवलं आहे. अलीकडेच तो हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. शिवाय लवकरच तो करण जोहरच्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख