-
बॉलिवूड अभिनेते देव आनंद हे चित्रपटसृष्टीतील एकमेव एव्हरग्रीन स्टार म्हणून ओळखले जातात. आजही देव आनंद या नावाची जादू कायम आहे.
-
अभिनय, दिग्दर्शन, निर्मितीबरोबरच देव आनंद यांनी राजकारणातही नशीब आजमावलं होतं हे फारसं कुणाला ठाऊक नाही.
-
इंदिरा गांधींच्या कार्यकाळात जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा देव आनंद यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती. देव आनंद काँग्रेसच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आली होती. यामुळे देव आनंद खूप संतापले आणि त्यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध करण्यासाठी चक्क स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला होता.
-
देव आनंद यांचे सहकारी मोहन चुरीवाला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले होते की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्याने देव साहेब संतापले होते आणि त्याचवेळी काँग्रेसने त्यांना एका राजकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते पण देव आनंद यांनी त्या कार्यक्रमास जाण्यास नकार दिला.
-
देव आनंद यांच्या या निर्णयाचा त्यांना चांगलाच फटका बसला. त्यांचे चित्रपट आणि गाण्यांवर बंदी घालण्यात आली. दूरदर्शन आणि विविध भारतीवरही देव यांच्या गाण्यांवर व चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती.
-
देव आनंद यांनी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री विद्या चरण शुक्ला यांची भेट घेतली आणि त्यांना जाब विचारला, की या लोकशाहीत राहतात त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वागण्याचा अधिकार नाही का?
-
देव आनंद यांच्या या भेटीचा परिणाम असा झाला की जेव्हा ते दिल्लीहून मुंबईला परतले तोवर त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती.
-
तरीही इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीच्या विरोधात म्हणून ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ या राजकीय पक्षाची स्थापना देव आनंद यांनी केली होती.
-
पक्ष स्थापनेमागील त्यांचा उद्देश असा होता की, देशभरातील लोक त्यात सामील होतील, त्यांच्या मदतीने देशात नवी व्यवस्था निर्माण होईल, पण देव यांच्या लक्षात आले की, निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे फारच कमी वेळ आहे आणि त्यांना उमेदवारांची कमतरता जाणवायल लागली, म्हणून त्यांनी राजकारण सोडले आणि अन् त्यांचा पक्षही कायमस्वरूपी बंद झाला. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया / इंडियन एक्सप्रेस)

“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल