-
देशभरात सध्या गणेशोत्सव मोठ्या आनंदात सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स आले होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणेश दर्शनासाठी बॉलिवूड स्टार सलमान खानने हजेरी लावली होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिता व तिचा पती आयुष्य शर्मा हे मुख्यमंत्र्यांच्या घरी असलेल्या गणेशासमोर नतमस्तक झाले. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी शाहरुख खाननेही हजेरी लावली होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
तसेच साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री श्रिया सर आणि पती आंद्रेई कोशिव देखील उपस्थित होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी झालेल्या या कार्यक्रमात बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार हिराणीही उपस्थित होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
या पूजेत अभिनेत्री भूमी पेडणेकरही सहभागी झाली होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेत्री ईशा गुप्ता देखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पूजेसाठी उपस्थित होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या पूजेमध्ये अवनीत कौरही सहभागी झाली होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
बोनी कपूर त्यांची मुलगी खुशी कपूरसोबत गणपती पूजेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरी आले होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
यावेळी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालही मुख्यमंत्र्यांच्या घरी उपस्थित होता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेते सुनील शेट्टी देखील मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी उपस्थित होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…