-
एका सुपरहिट मल्याळम चित्रपटाची ऑस्कर २०२४ साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली आहे. ‘2018: Everyone is a Hero’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
-
हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. समीक्षकांसह प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या चित्रपटाने ज्युरीचीही मनं जिंकली.
-
या चित्रपटात टोव्हिनो थॉमसची मुख्य भूमिका आहे. चित्रपट ऑस्करसाठी पाठवल्यावर अभिनेता टोव्हिनो थॉमसने प्रतिक्रिया दिली आहे.
-
टोव्हिनो थॉमसला दोन दिवसात दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. त्याने पोस्ट करून याबाबत माहिती दिली.
-
‘2018’ या चित्रपटातील माझ्या अभिनयासाठी मला काल आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला. – टोव्हिनो थॉमस
-
आज हा चित्रपट अकादमी पुरस्कारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. – टोव्हिनो थॉमस
-
होय, 2018 ही ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री आहे. आता “An the Oscar Goes to” ऐकण्याची आशा आहे… असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
टोव्हिनो थॉमसने सेप्टिमियस अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे.
-
त्यानंतर आज त्याची मुख्य भूमिका असलेला 2018 चित्रपट ऑस्करसाठी गेल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. (फोटो – टोव्हिनो थॉमस इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा