-
अभिनेता रणबीर कपूर आज आपला
-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने गेल्यावर्षी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली.
-
दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
पण लग्नाअगोदर रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं.
-
सुरुवातीला रणबीर कपूरच नाव अभिनेत्री सोनम कपूरबरोबर जोडलं गेलं होतं.
-
दोघांनी ‘सावरीया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण केलं.
-
या चित्रपटाच्या सेटवरच दोघांमधील जवळीक वाढली. रणबीर आणि सोनमनं एकमेकांना डेट काही काळ डेट केलं मात्र लवकरच दोघंही वेगळे झाले.
-
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचं नात सर्वाधिक चर्चेत राहिलं. एकेकाळी बॉलीवूडमध्ये दोघांची जोडी लोकप्रिय होती.
-
काही रिपोर्ट्सनुसार रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफची एन्ट्री झाल्यानं दीपिका आणि त्याच्या नात्यात दुरावा आला आणि दोघंही वेगळे झाले.
-
‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि कतरिनाची भेट झाली.
-
या चित्रपटाच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमातही पडले. दोघं एकमेकांशी लग्न करणार अशा चर्चा सुरू असतानाच अचानक त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
-
रणबीर कपूरचं नाव एकेकाळी अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबतही जोडलं गेलं होतं. या दोघांनी ‘रॉकस्टार’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
-
या चित्रपटाच्या सेटवरूनच रणबीर आणि नर्गिसनं एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. एवढंच नाही तर नर्गिससाठी रणबीरनं कतरिनाशी ब्रेकअप केल्याचंही बोललं जातं.
-
रणबीर कपूरनं प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील डेट केलं आहे. या दोघांनी ‘अंजाना अंजानी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
-
रणबीर आणि प्रियांकाचं नातं फार काळ टिकलं नाही. काही काळानंतर दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची एकेकाळी बरीच चर्चा झाली होती. दोघांनी एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं होतं.
-
दोघांच्या नात्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा झाली होती मात्र रणबीर किंवा श्रुतीनं या नात्यावर कधीच कोणतंही भाष्य केलं नाही.
-
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी रणबीर कपूरचं अवंतिका मालिकसोबत अफेअर होतं. मात्र नंतर काही कारणानं दोघांचंही ब्रेकअप झालं. (फोटो साभार- सोशल मीडिया)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण