-
अभिनेत्री कविता लाड-मेढेकर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळत असताना त्या मालिकेतून ब्रेक घेत थेट अमेरिकेला गेल्या आहेत.
-
याचं खास कारण म्हणजे त्यांचं नाटक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट.’
-
प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांचं हे नाटक सर्वत्र हाउसफुल सुरू आहे. तर या नाटकाचे सध्या अमेरिकेत विविध शहरांमध्ये प्रयोग सुरू आहेत.
-
याच नाटकाच्या दौऱ्यानिमित्त त्या जवळपास महिनाभर अमेरिकेला गेल्या आहेत.
-
यादरम्यानचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्या नाटकाच्या टीमबरोबर नाटकाचा हा दौरा खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.
-
हे फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “फ्रेंड्स, फॅमिली, प्रयोग आणि शॉपिंग.”
-
या फोटोंमध्ये त्यांचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.
-
तर आता त्यांच्या या फोटोंवर कमेंट करत त्यांचे चाहते त्यांची ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत.

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?