-
आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी केतकी माटेगावकर हिने आपल्या अभिनयानेदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
‘तानी’, ‘टाईमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटांमधून तिनं आपलं अभिनयकौशल्य दाखवलं आहे.
-
आता ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जलावा दाखवण्यासाठी ‘अंकुश’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
केतकीचा ‘अंकुश’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
-
पण सध्या केतकीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
-
अलीकडेच तिनं एका मुलाखतीमधून स्वतःच्या लग्नाविषयी भाष्य केलं.
-
‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलच्या रॅपिड फायर सेगमेंटमध्ये केतकी माटेगावकर सहभागी झाली होती. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘केतकी लग्न कधी करणार?’ यावर ती म्हणाली की, “झालंय लग्न. आता काय?”
-
केतकीच्या या उत्तरानंतर तिला पुन्हा विचारलं की, “खरं लग्न कधी करणार आहेस?” त्यानंतर तिनं पहिलं लग्न अन् नवऱ्याविषयी सांगितलं.
-
केतकी म्हणाली की, “माझं लग्न म्युझिकबरोबर झालं आहे. एकेदिवशी माझ्या आजीने मला लग्न कर म्हणून भंडावून सोडलं होतं. मग तिला मी माझ्या बोटावर असलेला टॅटू दाखवला आणि सांगितलं, मी म्युझिकबरोबर लग्न केलं आहे.”
-
पुढे केतकी म्हणाली की, “जो कोणी आता माझ्या आयुष्यात येईल ते माझं दुसरं लग्न असेल. माझा पहिला नवरा हे म्युझिक आहे. त्यामुळे दुसऱ्या नवऱ्याला पहिल्या नवऱ्याशी जमवून घ्यावं लागेल, असं सांगेन.”
-
दरम्यान, केतकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं यापूर्वी बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे.
-
‘अंकुश’ या चित्रपटानंतर केतकी ‘मीरा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिनं अभिनेता प्रसाद ओकबरोबर काम केलं आहे.

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…