-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेली गायिका केतकी माटेगावकर आता उत्तम अभिनेत्री देखील झाली आहे.
-
‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटातून तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
आता केतकीचा नवा चित्रपट ‘अंकुश’ चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
-
‘अंकुश’ चित्रपटात केतकीने रावीच्या भूमिका साकारली आहे. त्यामुळे सध्या ती या चित्रपटाच प्रमोशन करताना दिसत आहे.
-
नुकतीच केतकी एका एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलच्या रॅपिड फायर सेगमेंटमध्ये सहभागी झाली होती. आणि यावेळी तिने आवडत्या क्रश विषयी खुलासा केला.
-
तिला या रॅपिड फायर सेगमेंटमध्ये विचारलं की, “कोणाला फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज करायला आवडेल?”
-
याच प्रश्नाचं उत्तर देताना केतकी म्हणाली की, “माझा जॉनी डेप क्रश आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. मला तो भयंकर आवडतो. मला त्याचं काम आवडतं. त्यामुळे मी त्याला हॉलीवूड किंवा बॉलीवूड नाही तर मराठी अंदाजात प्रपोज करेन.”
-
दरम्यान, केतकीच्या आगामी अंकुश चित्रपटात दीपराज, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी जबरदस्त कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.
-
या ‘अंकुश’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची धुरा निशांत नाथाराम धापसे यांनी सांभाळली आहे.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”