-
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते.
-
उर्मिला ही अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी चाहत्यांच्या कायमच संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
सध्या उर्मिला ही तिचा लेक अथांग बरोबर गोव्यात सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.
-
याचे काही फोटो उर्मिलाने पोस्ट केले आहेत.
-
यावेळी उर्मिलाने काळ्या रंगाचा टॉप आणि त्याच रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
या फोटोत ती तिच्या लेकाबरोबर काही आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे.
-
यावेळी अथांगही गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मजा-मस्ती करताना पाहायला मिळत आहे.
-
“गोव्यात पडी टाकलीय सध्या, त्यातीलच काही निवांत क्षण!” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
उर्मिलाने शेअर केलेल्या या फोटोत तिचा फिटनेस पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान उर्मिलाने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप निर्माण केली.
-
‘दुहेरी’, ‘बन मस्का’ या मराठी मालिकांमध्ये ती झळकली.
-
तसेच ‘दिया और बाती हम’, ‘एक तारा’ यांसारख्या हिंदी मालिकेतही ती झळकली.
![9 February 2025 Rashi Bhavishya](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/9-February-2025-Rashi-Bhavishya.jpg?w=300&h=200&crop=1)
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल