-
‘ताली’ या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजसेविका गौरी सावंत यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला.
-
‘ताली’मध्ये अभिनेत्री सुश्मिता सेनने गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे.
-
‘ताली’ सीरिजच्या निमित्ताने गौरी सावंत आणि अभिनेत्री सुश्मिता सेन यांची पहिल्यांदा अभिनेत्रीच्या खार येथील घरी भेट झाली होती.
-
या भेटीविषयी गौरी सावंत म्हणतात, “सुश्मिता सेन माझी भूमिका करणार आहे हे समजल्यावर मी तिला भेटण्यासाठी तिच्या खारच्या घरी साधा बिस्किटचा पुडा घेऊन गेले होते.”
-
पहिल्या भेटीत गौरी सावंत यांनी सुश्मिताला “तू ही भूमिका का करत आहेस?” असा प्रश्न विचारला होता.
-
यावर सुश्मिताने त्यांना, “कारण तू एक आई आहेस आणि मी सुद्धा एक आई आहे.” असं उत्तर दिलं होतं.
-
सुश्मिताने कोणतेही आडेवेढे न घेता, तुम्हाला मी न्याय देऊ इच्छिते असं काहीच रडगाणं न गाता मनातलं खरं उत्तर दिल्याने गौरी सावंत यांना प्रचंड आनंद झाला होता.
-
विश्वसुंदरी सुश्मिता सेनने माझी भूमिका साकारणं हे आमच्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासारखं आहे. असं गौरी सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
-
दरम्यान, १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ताली सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”