-
अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित यांनी ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
-
रेणुका शहाणे ‘कोण होणार करोडपती’मध्ये काही महिन्यांपूर्वी पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘हम आपके है कौन’च्या सेटवरील काही आठवणी सांगितल्या.
-
“‘हम आपके है कौन’च्या सेटवर माधुरीने प्रचंड मदत केली आणि मला सांभाळून घेतलं” असं रेणुका शहाणे यांनी सांगितलं.
-
शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगताना त्या म्हणतात, “त्या काळात महिलांना पुरेशा सुविधा उपलब्ध व्हायच्या नाहीत. आऊटडोअर शूट करताना सेटवर स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने आम्ही मुली दिवसभर पाणीच प्यायचो नाही.”
-
“तू असं करू नकोस…जर दिवसभर पाणी प्यायली नाहीस, तर तुझ्या चेहऱ्याची वाट लागेल असा सल्ला मला तेव्हा माधुरीने दिला होता कारण, तिला स्किनचा प्रचंड व्हायचा.” असं रेणुका शहाणेंनी सांगितलं.
-
माधुरीने माझी प्रचंड काळजी घेतल्याने मला ‘हम आपके है कौन’च्या सेटवर छान वाटायचं असंही रेणुका यांनी आवर्जून नमूद केलं.
-
माधुरी दीक्षित रेणुका शहाणेंना सेटवर प्रेमाने ‘शहाणी’ या नावाने हाक मारायची.
-
दरम्यान, ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ रोजी प्रदर्शित झाला होता.
-
रेणुका शहाणे यांनी चित्रपटात माधुरीच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”