-
‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व – ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या आगामी पर्वामध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत स्पृहा जोशीच्या ऐवजी अभिनेत्री रसिका सुनील दिसणार आहे.
-
या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नाही तर रसिका सुनील करणार हे कळल्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या.
-
रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश झाले, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नसल्याने काहींनी निराशा व्यक्त केली.
-
याबरोबरच काही जणांकडून रसिका आणि स्पृहा यांची सूत्रसंचालिका म्हणून तुलना केली जात आहे.
-
आता या सगळ्यावर रसिकाने भाष्य केलं आहे.
-
‘लोकसत्ता ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “स्पृहाचं मला अर्थातच खूप कौतुक आहे. सूत्रसंचालनाचा तिचा एक वेगळा बाज आहे, एक वेगळी शैली आहे.”
-
“पण या पर्वात केलेल्या बदलाची तशीच गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं.”
-
“कारण आवाज तरुणाईचा अशी थीम आहे आणि या पर्वात अनेक गाणी नव्या अंदाजात सदर केली जातील.”
-
“त्यामुळे हा जो बदल केला गेला आहे तो त्या अनुषंगाने केला गेला आहे.”
-
“पण हे सगळं करत असताना जुन्यालाही आम्ही धरून ठेवणार आहोत. त्यामुळे स्पृहाचा इसेन्सही मला या कार्यक्रमात मिस होऊ द्यायचा नाहीये.”
-
“मी स्वतः तिची खूप मोठी चाहती आहे आणि तिने या आधीच्या पर्वांचं सूत्रसंचालन खरोखर खूप छान केलं आहे.”
-
“त्यामुळे मला आशा आहे की त्याचा समतोल साधत मी माझ्याकडून माझ्या व्यक्तिमत्वातलंही नवीन काहीतरी देऊ शकेन.”
-
पुढे ती म्हणाली, “मला छान वाटतंय की या प्रतिक्रिया चांगल्या अर्थाने विभागल्या गेल्या आहेत. काही मला प्रोत्साहन देत आहेत, तर काहीजण स्पृहाला मिस करत आहेत.”
-
“एखाद्या कलाकाराला ऑनस्क्रीन मिस करणं हे मी अगदीच समजू शकते. कारण काही वर्षांपूर्वी मीही एक मालिका सोडून गेले होते.”
-
“मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुम्हाला कधी ना कधीतरी याला सामोरं जावं लागतं आणि एका पॉईंटनंतर तुमच्या कामातून प्रेक्षकांकडून तुम्हाला ते प्रेम मिळवावं लागतं आणि मी तेच करत आहे.”
-
तर आता इतक्या समजूतदारपणे या सगळ्याला सामोरी जात असल्याने नेटकरी रसिकाचं कौतुक करत आहेत.
-
याशिवाय आता रसिका स्पृहाचि गादी कशी चालवतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल