-
मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत प्रार्थना बेहेरेचं नाव सामील आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच ती तिच्या नवऱ्याबरोबर मुंबई सोडून कायमचीअलिबागला स्थायिक झाली. आता तिने तेथील त्यांच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. प्रार्थनाचं अलिबागमधील घर अगदी ऐसपैस आहे आणि अंगणात भरपूर झाडंही आहेत.
-
छोट्याशा गेटमधून आतमध्ये गेल्यावर प्रार्थनाच्या घराच्या पुढच्या अंगणात विविध प्रकारची छोटी-मोठी झाडं लावली आहेत.
-
तिथून सरळ गेल्यावर दोन पायऱ्या चढलं की डाव्या बाजूला घराचा मुख्य दरवाजा दिसतो.
-
ही जागा ही त्यांनी खूप आकर्षक प्रकारे सजवली आहे.
-
याचबरोबर घराचा दरवाजा सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
-
घरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला लगेच किचन आहे. तर त्याच्यासमोर प्रशस्त हॉल आहे. विशेष म्हणजे हॉल आणि किचनच्यामध्ये भिंत नाही.
-
प्रार्थनाच्या घरी देवघरासाठीही स्वतंत्र जागा केली आहे.
-
तर याबरोबरच एका कोपऱ्यात छान डायनिंग टेबल ठेवलं आहे. हे डायनिंग टेबल संपूर्ण लाकडाचं असून याचा आकारही खूप हटके आहे.
-
त्यांच्या घरी एक स्वतंत्र बार काउंटरही तयार करण्यात आलं आहे.
-
तर सोफ्याच्या पलीकडच्या बाजूला मोठा दरवाजा करण्यात आला आहे. तिथून भरपूर प्रकाश येतो.
-
त्या दरवाजातून बाहेर गेलं की मागच्या बाजूला एक मोठी बाल्कनी आहे. तर या बाल्कनीतही बसायला व्यवस्थित जागा केली असून त्या व्यतिरिक्त भरपूर मोकळी जागा पाहायला मिळते.
(सर्व फोटो सौजन्य: प्रार्थना बेहेरे, यूट्यूब)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स