-
शनिवारी सकाळी हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. हमासकडून एकाचवेळी तब्बल ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
-
या घटनेनंतर इस्रायल सरकारने अवघ्या काही तासांत युद्धाची घोषणा केली. गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
-
या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, इस्रायलकडून केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये सुमारे १९८ जणांचा मृत्यू झाला. तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
-
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील या वादाला एक मोठा इतिहास आहे, तिथे अशा प्रकारच्या तणावकारक समस्या बऱ्याचदा निर्माण होत असतात. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील या संघर्षावर बेतलेल्या एक वेब सीरिजची आता प्रचंड चर्चा होत आहे.
-
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष नेमका कधीपासून सुरू आहे, त्यामागे असलेल ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् दहशतवादी संघटनेच्या विरोधात लढणाऱ्या काही शूर अधिकाऱ्यांची गोष्ट मांडणारी ‘फौदा’ ही सीरिज आपल्या चांगल्याच परिचयाची असेल.
-
नेटफ्लिक्सवर या सीरिजचे आत्तापर्यंत ४ सीझन येऊन गेले आहेत. साऱ्या जगात या वेब सीरिजला पसंत केलं गेलं आहे. इतकंच नव्हे भारतासह इतरही काही देशात या सीरिजच्या कथेवर वेब सीरिज बनवण्यात आल्या आहेत. आज आपण याच सीरिजबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
-
या सीरिजमधील सगी, कॅप्टन अयुब, वलीद, गाली ही पात्रं साकारणारे कलाकार हे इस्रायलमधील अत्यंत लोकप्रिय गायक, अभिनेते कॉमेडीयन आहेत ज्यांचं नाव इस्रायलमधील प्रत्येक घरातील सदस्याला ठाऊक आहे.
-
‘फौदा’मध्ये दाखवलेला इस्रायल व पॅलेस्टाइनमधील संघर्ष व वाद पाहून हमास ही संघटना एवढी अस्वस्थ झाली होती की या सीरिजला उत्तर देण्यासाठी त्यांनी त्यांची बाजू मांडणारीही वेब सीरिज सादर केली होती. हमासने काढलेल्या ‘Fist of the Free’ या वेब सीरिजलाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
-
‘फौदा’ ही अशी एकमेव वेब सीरिज आहे ही अरब आणि मुस्लिम राष्ट्रांतही तितकीच लोकप्रिय आहे. आधी ही सीरिज अरब देशातील काहीच लोक मनोरंजन म्हणून पाहायचे, पण जसा या सीरिजचा चौथा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला त्यावेळी या सीरिजला सर्वाधिक प्रतिसाद हा अरब व इतर मुस्लिम राष्ट्रांकडूनच आला होता.
-
‘फौदा’ ही पहिली आणि एकमेव हिब्रू आणि अरब भाषेतील वेब सीरिज आहे जिला जागतिक पातळीवर एवढी लोकप्रियता मिळालेली आहे. खासकरून नेटफ्लिक्सने या सीरिजचे हक्क घेतल्यापासून तिच्या लोकप्रियतेतच वाढच होत आहे.
-
मनोरंजनविश्वात येण्यापूर्वी ‘फौदा’ या सीरिजचा कर्ताधर्ता व यातील ‘डोरॉन’ची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता लिओर राज हा आधी हॉलिवूडमध्ये एका वेगळ्याच गोष्टीमुळे प्रसिद्ध होता. लिओर राज हा याआधी हॉलिवूड सुपरस्टार व कॅलिफोर्नियाचे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा खासगी अंगरक्षक म्हणून काम करायचा. यामुळे लिओरच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.
-
‘फौदा’या अरेबिक शब्दाचा अर्थ होतो ‘Chaos’ म्हणजेच ‘गोंधळ’. इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षामुळे निर्माण होणारी ही परिस्थिति अन् दहशतवादी संघटनेच्या मुसक्या आवळणाऱ्या शूर अधिकाऱ्यांची रंजक अन् दाहक वास्तव मांडणारी ‘फौदा’ ही सीरिज सध्या नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस / आयएमडीबी / सोशल मीडिया)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल