-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रेया बुगडे.
-
श्रेया बुगडेने ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे.
-
छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे ती घराघरात पोहोचली.
-
उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
-
सध्या श्रेयाच्या एअरपोर्ट लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
नुकतंच श्रेयाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
यात ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
-
त्याबरोबर तिने लहान कानातले, हातात पर्स, डोळ्याला काळा गॉगल आणि केसांचा आंबाडा असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
यावेळी तिच्या साधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
“तेरे बिन सानु सोह्निया, कोई होर नहियो लभना….. मी जेव्हा विमानतळावर येते, तेव्हा माझ्या याच भावना असतात”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
श्रेयाच्या या लूकवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.
-
त्यावर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “आज कुठे सकाळी सकाळी नटून थटून???” असा प्रश्न केला आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख