-
बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.
-
‘दिल्ली क्राइम सीझन २’ या वेब सीरिजमध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या व्यक्तिरेखेसाठी शेफालीला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२३ मिळाला आहे.
-
अलीकडेच, शेफाली शाहने तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, ती लहानपणी लैंगिक शोषणाची शिकार झाली होती.
-
शाळेतून घरी येताना बाजारात एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा खुलासा तिने केला.
-
पण शेफाली शाह व्यतिरिक्त अनेक कलाकारांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये अगदी दीपिका पदुकोणसह अक्षयकुमारचा समावेश आहे.
-
अक्षय कुमारने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो ६ वर्षांचा असताना त्याच्या शेजाऱ्याने त्याला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला होता. याबाबत त्याने वडिलांनाही सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली. (फोटो: अक्षय कुमार/इन्स्टाग्राम)
-
नीना गुप्ताने तिच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकात तिच्या लैंगिक शोषणाविषयी लिहिलं आहे. तिने सांगितलं आहे की, ती लहान असताना डॉक्टर आणि टेलरने तिचा विनयभंग केला होता. (फोटो: नीना गुप्ता/इन्स्टाग्राम)
-
दीपिका पदुकोणने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ती १४-१५ वर्षांची होती, तेव्हा एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. (फोटो: दीपिका पदुकोण/इन्स्टाग्राम)
-
पियुष मिश्रा यांनी त्यांच्या ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ या पुस्तकात त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. एका नातेवाईकाने त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं त्यांनी सांगितलं. (फोटो: पियुष मिश्रा/इन्स्टाग्राम)
-
कंगना रणौतने तिच्या ‘लॉक अप’ शोच्या एका एपिसोडमध्ये खुलासा केला होता की, ती लहान असताना तिच्यापेक्षा काही वर्षांनी मोठ्या मुलाने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
-
कल्की कोचलिनने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती ९ वर्षांची असताना तिचे लैंगिक शोषण झालं होतं. त्यावेळी तिला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे तिला काहीच समजलं नाही. (फोटो: कल्की कोचलिन/इन्स्टाग्राम)
-
सर्व फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…