-
यशाचे दुसरे नाव एसएस राजामौली हे सध्या समीकरणच बनले आहे. आज १० ऑक्टोबर रोजी राजामौली हे त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
ज्या चित्रपटाला हात लावतील त्याचं सोनं करतील असा परिसस्पर्श घेऊन आलेले राजामौली यांनी त्यांच्या कारकीर्दीत आजवर १२ चित्रपट बनवले व ते सगळे सुपरहीट झाले.
-
कुटुंबातील आर्थिक अडचणींवर मात करत राजामौली देशातील सर्वात महागडे दिग्दर्शक कसे बनले याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
-
एसएस राजामौली यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७३ रोजी कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील एका तेलुगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्ही. विजेंद्र प्रसाद हे एक प्रसिद्ध पटकथा लेखक आहेत आणि त्यांची आई घराची जबाबदारी सांभाळते. एसएस राजामौली यांचे पूर्ण नाव कोडुरी श्रीसेला श्री राजामौली आहे.
-
राजामौली यांच्या कुटुंबाकडे सुमारे ३६० एकर जमीन होती. पण वडील आणि काकांना चित्रपट बनवण्याचे इतके वेड होते की त्यांनी चित्रपटांसाठी सर्व जमीन विकून टाकली व मिळालेला सारा पैसा चित्रपटात गुंतवला.
-
त्यापैकी बरेच चित्रपट दणकून आपटले अन् राजामौली यांच्या कुटुंबाला आर्थिक चणचण भासू लागली. ही अवस्था पाहून एसएस राजामौली यांनी कमी वयातच काम करायचं ठरवलं. २० व्या वर्षापासूनच त्यांनी काम करायला सुरुवात केली.
-
चित्रपट संकलक के. व्यंकटेश्वर राव यांच्याकडे त्यांनी ट्रेनी म्हणून काम सुरू केलं. मग त्यांनी वडिलांना दिग्दर्शनात सहाय्यक म्हणून मदत केली आणि मग पटकथा लिहायला सुरुवात केली. २००१ मध्ये एसएस राजामौली यांनी ‘स्टुडंट नंबर १’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि चित्रपट चांगलाच हीट ठरला.
-
यानंतर ‘मगधीरा’, ‘यामाडोंगा’, ‘ईगा’, सारख्या चित्रपटांमधून राजामौली यांनी स्वतःला सिद्ध केलं.
-
‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनंतर राजामौली यांच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. या दोन्ही चित्रपटांनी मिळून ३००० कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला. इतकंच नव्हे तर जगभरात या चित्रपटांची दखल घ्यायला राजामौली यांनी भाग पाडलं.
-
‘बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर राजामौली यांनी ‘आरआरआर’सारखा जबरदस्त हीट चित्रपट दिला. ऑस्करप्राप्त या चित्रपटाने तब्बल १८ नवे रेकॉर्ड बनवले, जपानमध्ये सर्वाधिल कमाई करणारा ‘आरआरआर’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. जगभरात या चित्रपटाने १२३० कोटींची कमाई केली.
-
मीडिया रीपोर्टनुसार राजामौली यांची एकूण संपत्ती ही जवळपास १००० कोटी इतकी आहे. याबरोबरच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राजामौली १०० ते २०० कोटी इतकं मानधन घेतात.
-
एसएस राजामौली आता त्यांच्या ‘मेड इन इंडिया’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहेत, हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीवरील बायोपिक असणार आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस व सोशल मीडिया)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक