-
बॉलीवूडच्या सुपरस्टार रेखा यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे.
-
रेखा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.
-
कमी वयातच रेखा यांनी अभिनय करायला सुरुवात केली होती.
-
अभिनयाबरोबर रेखा आपल्या सौदर्यांमुळेही नेहमी चर्चेत राहतात.
-
वयाच्या ६९ व्या वर्षीही त्यांच सौदर्य सध्याच्या अघाडीच्या अभिनेंत्रीना मागे टाकतं
-
७० आणि ८० च्या दशकात अनेक कारणांनी रेखा यांचे नाव चर्चेत होते.
-
आपल्या लूकमुळे त्या नेहमीच सगळ्यांच लक्ष वेधून घेतात.
-
रेखा यांचा डोक्याला सिंदूर लावलेला लूक नेहमीच चर्चेत असतो.
-
ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नात रेखा डोक्याला सिंदूर लावून आल्या होत्या.
-
त्यांच्या या लूकमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते.
-
रेखांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या सिंदूरमागचं कारण सांगितलं होतं.
-
त्या म्हणालेल्या की त्या चित्रपटाच्या शूटमधून थेट आल्या होत्या आणि सिंदूर काढायला विसरल्या होत्या.
-
रेखा: द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात त्यांच्या या वादग्रस्त लूकचे अनेक उल्लेख आहेत.
-
पुस्तकात म्हटले आहे की १९८२ च्या राष्ट्रीय पुरस्कारादरम्यान रेखा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
-
कार्यक्रमादरम्यान भारताचे तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी रेखांना तुम्ही सिंदूर का लावता? असा प्रश्न विचारला होता.
-
सिंदूरच्या लुकबद्दल बोलताना रेखा म्हणालेल्या की, मला लोकांच्या प्रतिक्रियांची काळजी नाही. मला वाटते सिंदूर माझ्यावर छान दिसते. सिंदूर मला शोभते.
-
आजही रेखा जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्या कांजीवरम साडी, भारजरी दागिने आणि सिंदूर लावलेल्या लूकमध्ये दिसतात.
-
(फोटो: एक्सप्रेस संग्रह)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच