-
Happy Birthday Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे.
-
आजपर्यंतच्या सिनेकारकीर्दीत अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
-
बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी जोड्यांपैकी एक असलेल्या अमिताभ आणि जया यांची लव्ह स्टोरी रंजक आहे. (Express Archive Photo)
-
अमिताभ बच्चन आणि जया हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. (Express Archive Photo)
-
मात्र महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना जया अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या. (Express Archive Photo)
-
त्यातच त्या पुण्यात शिक्षण घेत असताना ‘बिग बी’ त्यांच्या पहिल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आले होते. (Express Archive Photo)
-
विशेष म्हणजे अमिताभ यांना पाहताच जया यांच्या मैत्रिणींनी त्यांना चिडवून प्रचंड त्रास दिला होता.
-
त्यानंतर ‘बिग बीं’प्रमाणेच जया यांचीही पावले चित्रपटसृष्टीकडे वळाली.
-
चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर जया यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासह स्क्रिन शेअर केली होती.
-
त्यानंतर या दोघांची जवळीक झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
जया आणि अमिताभ यांनी ‘जंजीर’ चित्रपटात एकत्र काम केले होते. (Express Archive Photo)
-
या दोघांनी ३ जून १९७३ साली लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर जया आणि अमिताभ यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली. मात्र, या साऱ्याला ते खंबीरपणे सामोरे गेले.
-
या जोडीला बॉलिवूडमध्ये ‘गोल्डन कपल’ म्हणून ओळखलं जातं.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमिताभ बच्चन/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख