-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही महिन्यांपूर्वी कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस खरेदी केलं.
-
अभिनेत्रीने या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असं ठेवलं आहे.
-
प्राजक्ता माळीचं फार्महाऊस सुंदर व्ह्यू, मोठ्या खोल्या, स्विमिंग पूल, आकर्षक फर्निचर अशा सुविधांनी परिपूर्ण आहे.
-
अभिनेत्रीच्या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असं असलं तरी, ‘द ग्रीन मोन्टाना’ या नावाने तिने हा सुंदर व्हिला एका नामांकित कंपनीकडे रजिस्टर केला आहे.
-
यामुळे आता कोणतेही पर्यटक रजिस्टर वेबसाईटवर बुकिंग करून प्राजक्ताच्या बंगल्यात राहू शकतात.
-
प्राजक्ताच्या या आलिशान फार्महाऊसमध्ये, जर पर्यटकांना राहायला जायचं असेल, तर एका दिवस भाडं किती असेल माहितीये का?
-
प्राजक्ता माळीच्या ‘द ग्रीन मोन्टाना’ या फार्महाऊसवर एकावेळी तब्बल १५ जण राहू शकतात. या बंगल्यावर येणाऱ्या पर्यटकांना किचन, ओव्हन, गॅस, स्विमिंग पूल, गार्डन अशा सगळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
-
पर्यटक येथे जेवणू बनवू शकत नाहीत. त्यांना केवळ जेवण गरम करता येईल. याशिवाय या फार्महाऊसमध्ये पर्यटकांना पाळीव प्राणी आणण्यास मनाई आहे.
-
या फार्महाऊसचं वीकेंडला (शनिवार-रविवार) एका दिवसाचं भाडं तब्बल ३० हजार रुपये आहे. तसेच सोमवार ते शुक्रवारदरम्यान पर्यटकांना १७ ते २० हजारापर्यंत एका दिवसाचं भाडं आकारण्यात येईल.
-
लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्या, पर्यटकांची गर्दी पाहून यामध्ये बदल केला जाऊ शकतो. असं व्हिला रजिस्टर असणाऱ्या अधिकृत साईटवर स्पष्ट करण्यात आलं आहे.
-
पर्यटकांना जेवणासाठी वेगळा खर्च करावा लागेल किंवा जवळच्या हॉटेलमधून पर्यटक जेवण मागवू शकतात अशी सोय करण्यात आली आहे.
-
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या नव्या फार्महाऊसचे फोटो पाहून मराठी कलाविश्वातील कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं