-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय असते.
-
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
-
आज सारा तेंडुलकरचा २६ वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकरी साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
-
१२ वी उत्तीर्ण असलेल्या सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या शिक्षण आणि करिअरबद्दल अनेकांना उत्सुकता असते, चला तर मग जाणून घेऊयात…
-
साराच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर तिचं शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून झालं आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी ५००० रुपये इतकी फी आहे. तर ७ वी पर्यंतच्या शिक्षणाची फी वर्षाला १ लाख ७० हजार इतकी आहे.
-
या शाळेत ८ वी ते दहावीची वार्षिक फी ५.९ लाख इतकी असून ११ व १२ वीची वार्षिक फी ९.६५ लाखांच्या आसपास आहे. अर्थात या फीबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नसून हे आकडे मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आले आहेत. शिवाय सारा ज्यावेळी या शाळेत शिकत होती, तेव्हाची आणि आत्ताची फी यात तफावत असू शकते.
-
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी सारा युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे गेली.
-
साराने या कॉलेजमधून मेडिसिन (वैद्यकशास्त्र) या विषयात पदवी घेतली.
-
‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन’च्या वेबसाईटनुसार या कॉलेजची वार्षिक फी जवळपास ९.३ लाख इतकी आहे.
-
साराने आपल्या आईच्या पावलापावर पाऊल ठेवत मिडीकलमध्ये स्वतःचं करिअर करायचं ठरवलं आहे, तर भाऊ अर्जुन तेंडुलकर हा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटविश्वात येऊ पहात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर / इंस्टाग्राम पेज)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख