-
अभिनेता आमिर खानची लेक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
आयरा खानच्या लग्नाची तारीख ठरली आहे.
-
खुद्द आमिरनेच आयराचं लग्न कधी होणार याबाबत माहिती दिली आहे.
-
आयरा व नुपूर शिखरे यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी साखरपुडा केला होता.
-
आता वर्षभराने दोघेही लग्नबंधनात अडकतील.
-
दोघांचं लग्न नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये होणार आहे, असं आमिरने सांगितलं आहे.
-
‘न्यूज १८ इंडिया’शी बोलताना आमिरने मुलीच्या लग्नाची तारीख सांगितली.
-
आयरा ३ जानेवारीला लग्न करणार आहे. मुलगा तिने निवडलेला आहे. – आमिर खान
-
तो ट्रेनर आहे. त्याचे नाव नुपूर आहे. – आमिर खान
-
तो खूप छान मुलगा आहे. जेव्हा आयरा नैराश्याशी लढत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. – आमिर खान
-
तो खरोखरच तिच्या पाठीशी उभा राहिला आणि तिला भावनिक आधार दिला.
-
मला आनंद आहे की तिने एक असा मुलगा निवडला जो खूप चांगला आहे आणि ज्याच्याबरोबर ती खूप आनंदी आहे. – आमिर खान
-
ते खूप कनेक्टेड आहेत.- आमिर खान
-
ते एकमेकांची खूप काळजी घेतात. – आमिर खान
-
मुलीच्या लग्नात भावुक होणार का? असं विचारल्यावर आमिरने उत्तर दिलं.
-
मी तर खूप भावुक व्यक्ती आहे. – आमिर खान
-
आयराच्या लग्नाच्या दिवशी मी खूप रडणार आहे. – आमिर खान
-
त्यादिवशी आमिरची काळजी घ्या अशी चर्चा घरात सुरू झाली आहे,कारण मी माझं हसणं किंवा रडणं नियंत्रित करू शकत नाही. – आमिर खान
-
दरम्यान, आयरा व नुपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
दोघांच्या लग्नाची तयारी सुरू आहे.
-
(फोटो – आयरा खान इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख