-
मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी.
-
‘पुढचं पाऊल’ मालिकेतून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेतील जुईने साकारलेली कल्याणी भूमिका चांगलीच गाजली.
-
त्यानंतर तिनं काही मालिकांमध्ये काम केलं. तसेच ती छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’मध्येही झळकली.
-
अशी ही मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
-
जुई ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच मालिकेतील अपडेट देखील देत असते.
-
अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी तिच्या लग्नापासून ते तिच्याकडे कुठल्या गाड्या आहेत? असे बरेच प्रश्न चाहत्यांनी विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तर तिनं दिली.
-
या सेशनमध्ये तिला एका चाहत्याने विचारलं की, फिटनेससाठी काय करतेस? तू खूप गोड आहेस.
-
चाहत्याच्या या प्रश्नावर जुईने मजेशीर उत्तर दिलं.
-
जुई म्हणाली, “रोज १४ ते १५ तास काम करते. खूप कष्ट करते. त्यामुळेच मी बारीक आहे.”
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल