-
अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची तारीख ठरली आहे. आमिरनेच आयराचं लग्न कधी होणार याबाबत माहिती दिली आहे.
-
आयरा खान व नुपूर शिखरे ३ जानेवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
मुलीच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करताना आमिरने होणाऱ्या जावयाचं कौतुक तर केलंच, पण त्याच्या आईबद्दलही विधान केलं.
-
आमिरने नुपूर आपल्या मुलासारखा असल्याचं म्हटलं. तो खूप चांगला मुलगा आहे, असं म्हटल्यानंत त्याने विहीणबाई प्रीतम शिखरे यांचा उल्लेख केला.
-
आमिर खान मुलीच्या होणाऱ्या सासूबाईंबद्दल काय म्हणाला, ते पाहुयात.
-
नुपूर खूप चांगला मुलगा आहे, आम्हाला वाटतं की तो कुटुंबाचा एक भाग आहे. – आमिर खान
-
त्याची आई प्रीतमजी खूप चांगल्या आहेत. – आमिर खान
-
प्रीतमजी आधीच आमच्या कुटुंबाचा एक भाग झाल्या आहेत असं आमिर खान म्हणाला.
-
दरम्यान, आयराने तिच्या साखरपुड्यात सर्वात आनंदी व्यक्ती म्हणत सासूबाईंचे फोटो शेअर केले होते.
-
या फोटोंमध्ये प्रीतम शिखरे मनसोक्त डान्स करताना दिसत होत्या.
-
किरण राव, आयरा आणि इतर पाहुण्यांबरोबरही प्रीतम यांनी ठुमके लगावले होते.
-
साखरपुड्यातील फोटोंमध्ये आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
-
मागच्या वर्षी दिवाळीतही आयराने सासूबाईंबरोबर फोटो शेअर केले होते.
-
एकंदरीतच आमिरला मराठमोळा जावई आणि विहीणबाईंचं खूप कौतुक आहे. (सर्व फोटो – आयरा खान इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”