-
‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाला नुकतीच सुरूवात झाली आहे.
-
‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाच्या आलिशान घराची झलक आता सर्वांसमोर आली आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतल्यावर प्रेक्षकांना मोठ्या अक्षरात लिहिलेलं ‘Bigg Boss’ हे नाव आणि स्विमिंग पूल पाहायला मिळतं.
-
घराच्या प्रवेशद्वारावर असणारा ‘फ्लाईंग हॉर्स’ (घोडा) सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
-
‘बिग बॉस’च्या घरात गार्डन आणि जिमसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे.
-
बेडरुम आणि लिव्हिंग रुमचा लूक पूर्णपणे युरोपियन स्टाईलमध्ये डिझाईन करण्यात आला आहे.
-
घरातील किचनमध्ये सदस्यांना अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
-
‘बिग बॉस १७’च्या घरात स्पर्धकांसाठी खास ‘गॉसिप अड्डा’ तयार करण्यात आला आहे.
-
गॉसिप अड्ड्याप्रमाणे प्रेक्षकांना यंदा घरामध्ये थेरपी रुमदेखील पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या नव्या घराची थीम पाहून प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कलर्स वाहिनी इन्स्टाग्राम )

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…