-
ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांच्याकडे ९०च्या दशकातील मराठमोळ लोकप्रिय जोडपं म्हणून पाहिलं जातं.
-
मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनय कौशल्याने या जोडप्यानं छाप पाडली आहे.
-
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात ऐश्वर्या व अविनाश यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
या जोडीने पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्या तारुण्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.
-
सध्या ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांचे रील्स खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
-
कधी योगाचे रील्स तर कधी डान्सचे रील्स हे दोघं सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
पण दोघांचे डान्स रील्स काहींना पसंतीस पडत आहेत, तर काही लोकांना ते खटकतं आहेत. त्यामुळे या नारकर जोडप्याला ट्रोल केलं जात आहे.
-
पण या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर खडे बोल सुनावताना दिसत आहेत.
-
एका नेटकऱ्यानं अविनाश नारकरांना “नमस्कार आजोबा” असं एका रीलवर म्हटलं होतं. ऐश्वर्या नारकरांनी त्या नेटकऱ्याला त्याच्याच भाषेत जबरदस्त उत्तर देत म्हटलं, “काय म्हणताय पंजोबा”
-
तसेच एका दुसऱ्या नेटकऱ्यानं त्यांच्या रीलवर “म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा” अशी प्रतिक्रिया केली होती. त्याला उत्तर देत ऐश्वर्या म्हणाल्या, “बुद्धी गंजेल असे विचार करून, तुमच्या घराण्यात म्हातारचळ लागण्याचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तर दुसऱ्यांना बोलण्यात सगळंच राहून जाईल.. म्हातारचळचा अर्थही बघून घ्या जरा.. बुद्धी भ्रष्ट,” असं लिहीत पुढे हसण्याचा इमोजी टाकला होता.
-
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या फोटोचा एक रील काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. या रीलमधील प्रतिक्रियेत एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, अतिहुशार जोडपं…म्हणूनच सिनेसृष्टीमधून बाहेर झालं. यावर ऐश्वर्या सडेतोड प्रत्युत्तर देत म्हणाला, “कोण म्हणतंय असं? घरी या एकदा…काय कमवलंय ते दाखवतो…थोडा स्मार्टनेस कमवा…कसा आदर ठेवावा इतकी तरी अक्कल येऊ दे तुम्हाला हीच प्रार्थना देवाकडे…”
-
आणखी एका नेटकरीनं “म्हाताऱ्यालाच लागलाय चळ रील करतायत बळं” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर ऐश्वर्या नारकर म्हणाला, “काय भाषा, काय संस्कार…हेच कंटेंट लिहिण्या इतकी बुद्धी आहे का? आपली स्वतःची लायकी काय…आपण कोणाला काय बोलतोय याचं भान ठेवायला आई वडील कमी पडले….पुण्याचा असून…तुमचा दोष नाही..”
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच