-
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
-
दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर रोहित शेट्टीने नुकतीच ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची घोषणा करत अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रदर्शित केला.
-
दीपिका पदुकोण या चित्रपटात शक्ती शेट्टीची भूमिका साकारणार आहे.
-
चित्रपटाच्या पोस्टरवरील दीपिकाच्या रावडी लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
दीपिका पदुकोण पाठोपाठ रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
-
डॅशिंग लूक, डोळ्यावर गॉगल अशा जबरदस्त लूकचा फोटो शेअर करत ‘सिंघम अगेन’ चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफची एन्ट्री झाल्याचं रोहित शेट्टीने जाहीर केलं आहे.
-
“आमचा स्पेशल टास्क फोर्स ऑफिसर ACP सत्या” असं कॅप्शन दिग्दर्शकाने या पोस्टला दिलं आहे.
-
रोहित शेट्टीच्या कॅप्शनवरून ‘सिंघम अगेन’ चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ एसीपी सत्याची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
दरम्यान, ‘सिंघम अगेन’ चित्रपट पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( सर्व फोटो : इन्स्टाग्राम )

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य