-
आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे.
-
नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे.
-
आपल्या अस्सल ग्रामीण लहेजाने मकरंद अनासपुरेंनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
मकरंद यांनी अभिनया व्यतिरिक्त सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. एवढंच नाही तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक संवेदनशील व्यक्ती आहेत.
-
या सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी खूप धडपड करत मेहनत घेतली होती. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
या लोकप्रिय अभिनेत्याचे शिक्षण किती झालंय? दहावीत किती टक्के मिळाले होते? जाणून घ्या
-
मकरंद अनासपुरे यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे औरंगाबादमध्ये झालं होतं.
-
१९९३ साली सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी बीएससी केलं. तर १९९४ साली अनासपुरे यांनी औरंगाबाद विद्यापीठातून बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स केलं होतं.
-
बारावीमध्ये मकरंद अनासपुरे प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले असून दहावीमध्ये त्यांना ८० टक्के मिळाले होते.
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार