-
निवेदिता सराफ या गेली अनेक वर्षं विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. पण आता निवेदित आहे त्यांचं मूळ नाव नाहीच असा खुलासा त्यांनी केला आहे.
-
निवेदिता सराफ यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमात एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं.
-
या मुलाखतीत बोलताना त्यांनी त्यांच्या बारशाच्या वेळी त्यांचं नाव निवेदिता ठेवलंच नव्हतं असं सांगितलं.
-
त्या म्हणाल्या, “बबन प्रभू यांनी माझं नाव निवेदिता असं ठेवलं. शाळेत माझं नाव आई-बाबांनी वेगळं ठेवलं होतं ते नाव बबन प्रभू यांनी येऊन बदललं.”
-
“मी खरोखर खूप खुश आहे त्यांनी माझं नाव बदललं.”
-
“माझी बहीण माझ्यापेक्षा साडेचार वर्षांनी मोठी आहे. तिला माझं नाव चंदाराणी असं ठेवाव असं वाटलं. ठीक आहे ती लहान आहे, पण आईने काही नाव ठेवायचा विचार करावा?”
-
या नावामागची गोष्ट सांगत त्या म्हणाल्या, “तेव्हा ‘चंदाराणी का गं दिसतेस तू थकल्यावाणी’ हे गाणं माझ्या बहिणीला खूप आवडायचं.”
-
“त्यामुळे तिला तिच्या धाकट्या बहिणीचे नाव चंदाराणी असे ठेवायचं होतं. ते नंतर बबन काकांनी माझं नाव बदलून निवेदिता असं ठेवलं.”
-
तर आता त्यांचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल