-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे मालिकेतील आता प्रत्येक व्यक्तिरेखा घराघरात पोहोचल्या आहे.
-
जरी अरुंधती ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असली तरी इतर व्यक्तिरेखांवर प्रेक्षक तितकंच प्रेम करत आहेत.
-
आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील जुनी संजना म्हणजे अभिनेत्री दीपाली पानसरे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
दीपाली पानसरे हिने कोरोनाचा काळ्यात ‘आई कुठे काय करते’ मालिका सोडली होती.
-
आता दीपाली नव्या मालिकेत झळकणार आहे.
-
अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत दीपाली पाहायला मिळणार आहे.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत दीपाली कोणत्या भूमिकेत झळकणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण दीपालीने या मालिकेचा प्रोमो शेअर केल्यामुळे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये ती पाहायला मिळाले हे निश्चित झालं आहे.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
-
दरम्यान, दीपालीने यापूर्वी ‘देवी’, ‘देवयानी’ अशा बऱ्याच मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…