-
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
-
अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नवऱ्यासह फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती.
-
सई लोकूरने बाळाचं स्वागत करण्यासाठी काही काळासाठी मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला आहे.
-
सध्या ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नुकताच सईच्या घरी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
सईने या कार्यक्रमासाठी जांभळ्या रंगाचा गाऊन, डोक्यावर फुलांचा सुंदर तिआरा, हातात फुलांची परडी असा सुंदर लूक केला होता.
-
डोहाळे जेवणासाठी अभिनेत्रीच्या घरी रंगीबेरंगी फुगे आणि फुलांची सजावट करण्यात आली होती.
-
सईच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तिच्या जवळच्या मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी लाडक्या सईसाठी खास तयारी केली होती.
-
“माय फेरी टेल बेबी शॉवर” असं कॅप्शन सई लोकूरने तिच्या डोहाळे जेवणाच्या फोटोंना दिलं आहे.
-
“मला एखाद्या राजकुमारीसारखं वाटतंय”, असंही सईने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
-
सईच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर / इन्स्टाग्राम)

‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो