-
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अभिनेत्री तेजस्विनी पंडितला ओळखले जाते.
-
तिने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांसह मालिकांमध्येही ती झळकली.
-
‘समांतर’ आणि ‘रानबाजार’ या दोन सुपरहिट वेब सीरिजमध्येही तिने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
-
‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारी तेजस्विनीने काही दिवसांपूर्वी निर्माती क्षेत्रात पदार्पण केले.
-
गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनीला तू लग्न कधी करणार, सेटल कधी होणार असे प्रश्न केले जात आहेत.
-
आता नुकतंच तिने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले.
-
तेजस्विनीने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यात तिने तिच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले.
-
“मी सेटल आहे. मी आता माझ्या आयुष्यात पूर्णपणे सक्षमरित्या उभी आहे.”
-
“मला कुणाशीही लग्न करणं किंवा आयुष्यात पुरुष असणं हे माझ्या सेटल होण्याचे कारण नाही किंवा उदाहरणं नाही.”
-
“मी सेटल आहे, मी खुश आहे. मी मजेत आहे.”
-
“मी काम करतेय आणि मी माझ्या परिवाराला सांभाळतेय.”
-
“मी करिअर करतेय, मी अभिनय करतेय, मी निर्मिती क्षेत्रातही सक्रीय आहे. मी व्यावसायिकादेखील आहे.”
-
“मी खूप गोष्टी करतेय आणि त्यासाठी मला कोणत्याही पुरुषाच्या पावतीची गरज नाही.”
-
दरम्यान तेजस्विनी पंडितने केदार शिंदेच्या बहुचर्चित ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
त्यानंतर ती ‘नाथा पुरे आता’, ‘फॉरेनची पाटलीण’, ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘पकडा पकडी’, ‘कँडल मार्च’, ‘एक तारा’, ‘तू ही रे’, ‘देवा’, ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटात झळकली.
-
तेजस्विनीने स्टार प्रवाहवरील ‘तुझे नी माझे घर श्रीमंताचे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
‘समांतर’ आणि ‘रानबाजार’ या दोन सुपरहिट वेब सीरिजमध्येही तिने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती.
-
तेजस्विनीने १६ डिसेंबर २०१२ रोजी तिचा बालपणीचा मित्र भूषण बोपचे याच्याशी विवाह केला होता.
-
भूषण हा उद्योगपती रामेश्वर रूपचंद बोपचे यांचा मुलगा आहे.
-
मात्र काही त्यांनी घटस्फोट घेतला. सध्या तेजस्विनी एकटी असून ती निर्माती म्हणूनही नाव कमावत आहे.
-
फोटो – तेजस्विनी पंडित/ सोशल मीडिया
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती