-
‘टिप टिप बरसा पानी’, ‘तू चीज बडी है मस्त मस्त’, ‘अखियों से गोली मारे’, ‘सोना कितना सोना है’ अशी सुपरहिट गाणी देऊन ९० चं दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन होय. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
आज रवीना टंडनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिची व तिचे पती अनिल थडानी यांनी लव्ह स्टोरी जाणून घेऊयात. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
अक्षय आणि रवीना यांनी १९९४ मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. (फोटो – रवीना टंडन, अक्षय कुमार इन्स्टाग्राम)
-
दोघांनी साखरपुडा केला होता आणि ते लग्नही करणार होते, पण त्यापूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. (फोटो – रवीना टंडन, अक्षय कुमार इन्स्टाग्राम)
-
ब्रेकअपनंतर रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने पती अनिल थडानीबरोबरच्या तिच्या प्रेमकथेबद्दल खुलासा केला. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
तिने अनिलला पहिल्यांदा एका व्हॅलेंटाईन डे पार्टीमध्ये पाहिलं होतं. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
परंतु त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.(फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
“आम्ही भेटलो आणि आम्ही ४ ऑगस्ट २००३ रोजी बोलू लागलो आणि फेब्रुवारी २००४ मध्ये आमचे लग्न झाले,” असं तिने सांगितलं. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
अनिलने तिचा पहिला चित्रपट ‘पत्थर के फूल’ चे वितरण केले होते हे तिला माहीत नव्हतं. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
पण जेव्हा ती ‘स्टम्प्ड’ नावाचा चित्रपट बनवत होती तेव्हा त्यांची पहिली भेट झाली. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी २००४ मध्ये उदयपूरमध्ये लग्न केलं. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
रवीनाशी लग्न करण्यापूर्वी अनिल थडानीचा घटस्फोट झाला होता. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव नताशा सिप्पी होतं. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
लग्नानंतर अनिल व रवीना दोन मुलांचे पालक झाले. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)
-
त्यांना राशा नावाची लेक व रणबीर नावाचा मुलगा आहे. (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”