-
कंगना राणौतचा ‘तेजस’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. या चित्रपटात कंगना फायटर प्लेन पायलटच्या भूमिकेत दिसत आहे. कंगना राणौतला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
-
तेजस कंगनाच्या भविष्यातील करिअरचा निर्णय घेईल, असे अनेकांचे मत आहे. जर हा चित्रपट हिट झाला तर कंगनाच नाही तर तिच्या चाहत्यांनाही खूप आनंद होईल. वास्तविक, गेल्या ४ वर्षांत कंगना राणौतचे ५ चित्रपट प्रदर्शित झाले आणि पाचही चित्रपट फ्लॉप ठरले. चला पाहुया:
-
कंगना राणौतचा मणिकर्णिका हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ९२ कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई सरासरी होती.
-
मणिकर्णिका नंतर कंगना राजकुमार रावसोबत ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटात दिसली होती. ३३ कोटींच्या कलेक्शनसह हा चित्रपट फ्लॉप ठरला.
-
२०२२ मध्ये कंगनाचा ‘पंगा’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. या फ्लॉप चित्रपटाने २९ कोटींचा व्यवसाय केला.
-
२०२१ मध्ये कंगना राणौत ‘थलायवी’मध्ये दिसली होती. जयललिता यांच्यावर आधारित हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. हा चित्रपट केवळ ४.७५ कोटींचा व्यवसाय करू शकला.
-
कंगना राणौतलाही तिच्या ‘धाकड’ या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला. २.५८ कोटींचा व्यवसाय करून हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला.
-
कंगना राणौतचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील काही आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. चित्रपटाचे एकूण कलेक्शन फक्त ५१ कोटी होते.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल