-
कोल्हापूरच्या विशाल पिंजानीने ६ ऑक्टोबर रोजी यंदाची ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ ही स्पर्धा जिंकली.
-
सध्या तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्या ‘मिस्टर गे वर्ल्ड २०२३’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
-
‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत विशालने समलैंगिकता स्वीकारताना आलेल्या अनुभवांबदद्ल माहिती दिली.
-
“एकेदिवशी माझ्या एका मित्राने ‘तू गे आहेस का’? असं विचारलं. तेव्हापर्यंत मी गे हा शब्द ऐकलाही नव्हता. – विशाल पिंजानी
-
त्या शब्दाचा अर्थ माहीत नसल्याचं मी त्याला म्हणालो. त्याने ज्या टोनमध्ये तो शब्द वापरला, त्यावरून तो शब्द खूप वाईट असावा किंवा कुठलातरी आजार असावा असं मला वाटलं. – विशाल पिंजानी
-
मी ऑनलाइन हा शब्द शोधला आणि तेव्हा मला कळालं की गे म्हणजे समलैंगिक पुरुष. – विशाल पिंजानी
-
त्यानंतर मी गे आहे, असं मला समजलं. तोपर्यंत माझ्या भावनांमुळे मला असं वाटायचं की जगातील मी एकटाच असा पुरुष आहे, ज्याला स्त्रियांचं नाही तर पुरुषांचं आकर्षण आहे. – विशाल पिंजानी
-
वयाच्या १६ व्या वर्षी विशालला तो समलैंगिक असल्याची जाणीव झाली होती. आता तो ४० वर्षांचा आहे.
-
गे असण्याबाबत घरी सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल विशालने सांगितलं. तसेच बहिणीने मारल्याचा एक प्रसंगही सांगितला.
-
काही काळाने मी माझ्या लैंगिकतेबद्दल घरी सांगितलं, पण पालकांनी लगेच स्वीकारलं नाही. – विशाल पिंजानी
-
मी नैराश्यात होतो त्यामुळे त्यांनी माझी चांगली काळजी घेतली. – विशाल पिंजानी
-
कालांतराने त्यांच्या मनातील चुकीच्या धारणा मी त्यांना योग्य माहिती देऊन बदलल्या. – विशाल पिंजानी
-
एकेदिवशी रात्री बहिणीने उठून मला मारलं. ‘तू आमचं नाव खराब केलंस तर आमची लग्नं कशी होणार, आम्हाला स्थळं कशी येणार?’ असं तिचं म्हणणं होतं. – विशाल पिंजानी
-
“खरं तर त्यावेळी ते सगळे तसे का वागत होते, ते मला कळत होतं कारण त्यांना व्यक्त व्हायची दुसरी पद्धतच माहीत नव्हती,” असं विशाल म्हणतो.
-
सध्या विशाल मित्रांबरोबर मिळून समलैंगिक लोकांसाठी ‘अभिमान’ नावाची संस्था चालवतो. (सर्व फोटो – विशाल पिंजानी इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार