-
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे अशोक शिंदे.
-
अशोक शिंदे यांनी नायक, सहनायक आणि खलनायक अशा भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते.
-
काही दिवसांपूर्वी अशोक शिंदे यांनी त्यांच्या डाएटविषयी सांगितलं होतं.
-
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात अभिनेता भाऊ कदमने अशोक शिंदेंना त्यांच्या डाएटविषयी विचारलं होतं.
-
त्यावेळेस अशोक शिंदे म्हणाले होते, “साखर बंद करायची. अजिबात साखर खायची नाही. साखरेचा चहा नाही, गोड खायचं नाही. सगळे पदार्थ उकडलेले म्हणजे सगळ्या भाज्या पाण्यात उकडवून खायच्या.”
-
तसेच पुढे शिंदे म्हणाले होते, “चपाती, भात बंद करायचा. एवढं करून एक तास स्वतःसाठी व्यायामाला द्यायचा.”
-
सध्या अशोक शिंदे झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत काम करताना दिसत आहे.
-
‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत अशोक शिंदे यांनी रघुनाथराव ही भूमिका साकारली आहे.
New Passport Rules: सरकारने बदलले पासपोर्टचे नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य, जाणून घ्या बदल