-
राजकुमार संतोषी यांचा ‘खाकी’ हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय आणि तुषार कपूर यांसारखे मोठे स्टार्स मुख्य भुमिकेत दिसले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.
-
आता या चित्रपटाचे दिवंगत निर्माते केशू रामसे यांचा मुलगा आर्यमन रामसे याने नुकतेच एका मुलाखतीत खाकीच्या सिक्वेलबद्दल सांगितले आहे. आर्यमनने खुलासा केला आहे की, तो खाकीचा सीक्वल बनवत आहे.
-
आर्यमन म्हणाला, “स्क्रिप्टवर काम सुरू आहे आणि आमच्याकडे एक कथानक आहे. पुढच्या वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची योजना आहे. पुढच्या वर्षी चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होत आहेत.”
-
स्क्रिप्टबाबत आर्यमन म्हणाला, “सीक्वलमध्ये एक नवीन कथा असेल जी आजच्या काळावर आधारित असेल. यासोबतच नवीन स्क्रिप्ट मूळ कथेला पुढे घेऊन जाईल.”
-
चित्रपटाच्या कास्टिंगबाबत आर्यमन म्हणाला की, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय आणि अजय देवगणशिवाय तो चित्रपटाची कथा पुढे नेणार आहे. वास्तविक, चित्रपटाच्या पहिल्या भागात अजय देवगण, अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय यांच्या पात्रांचा मृत्यू झाला, त्यामुळे हे स्टार्स सिक्वेलमध्ये दिसणार नाहीत.
-
या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि तुषार कपूर असू शकतात. जेव्हा स्क्रिप्ट पूर्णपणे तयार होईल तेव्हा मी अमित जी आणि तुषार कपूर यांच्याशी बोलेन, असे आर्यमनने सांगितले. याशिवाय चित्रपटासाठी नवीन कास्टिंगही करण्यात येणार आहे.
-
आर्यमन म्हणाला, ‘चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राजकुमार संतोषी यांच्याशी बोलणी झाली असून त्याने सिक्वलचे दिग्दर्शन करावे अशी माझी इच्छा आहे.’ ‘खाकी’ हा चित्रपट २० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांची कमाई केली होती.
(फोटो स्रोत: इंडियन एक्सप्रेस)
![US Illegal Immigrants deported](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Latest-Marathi-News-2025-02-06T085413.429.jpg?w=300&h=200&crop=1)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा