-
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंजली पाठक म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर नेहमीच चर्चेत असते.
-
सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावरील पोस्टमुळे अक्षया चर्चेचा विषय असते.
-
अक्षया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी सुंदर, मनमोहक फोटो शेअर करते तर कधी व्हिडीओ शेअर करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
सध्या राणादा म्हणजे पती, अभिनेता हार्दिक ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. शिवाय त्याचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येत आहे.
-
पण दुसऱ्याबाजूला अक्षया देवधर सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.
-
अक्षया कुठल्याही मालिकेत किंवा चित्रपटात काम करताना दिसत नाहीये. यामागचं कारण नुकतंच हार्दिकने दिलं आहे.
-
काही दिवसांपूर्वी ‘नमो रमो नवरात्री’ या कार्यक्रमात अभिनेता हार्दिक जोशी सहभागी झाला होता. त्यावेळी ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना हार्दिकने अक्षया सध्या काम का करत नाही? याबाबत सांगितलं.
-
हार्दिक म्हणाला, “लग्नानंतर वर्षभर मी घरात नाहीये. लग्न करून पुण्यात गेल्यानंतर देवीच्या कृपेने, प्रेक्षकांच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने मी सतत काम करतोय. कारण ती एक स्त्री पाठिशी उभी आहे, ती समजून घेतेय आणि तिने स्वतःची कामं थांबवली आहेत. तू पहिला सेट हो, मग मी काम करते, असं अक्षयाचं म्हणणं आहे.”
-
पण लवकरच अक्षया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू