-
Zee Marathi Award 2023: मालिका विश्वातील मानाचा आणि झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’.
-
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् यांनी कार्यक्रमाला एक वेगळीच बहार आणली.
-
या सगळ्याबरोबरच आणखी एक कार्यक्रम गाजला तो म्हणजे आपल्या ‘अप्पी’चं डोहाळे जेवण.
-
झी मराठीच्या सर्व नायिकांनी मिळून ‘अप्पी’चे डोहाळे पुरवले, कलेक्टर ‘अप्पी’ची PA म्हणजेच छोट्या छकुलीने एक धमाकेदार नृत्य केलं.
-
‘अप्पी’च्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने हजेरी लावली.
-
माधुरी दीक्षितने अर्जुनला अप्पीची काळजी घेण्याचा प्रेमाचा सल्ला पण दिला.
-
या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अप्पीचं कौतुक करायला आलेल्या सगळ्यांनी पेढा की बर्फी अशी गोड विचारणा देखील केली.
-
काय असेल या डोहाळे जेवण कार्यक्रमात पेढा की बर्फी?
-
तेव्हा पाहायला विसरू नका ‘अप्पी’च्या डोहाळे जेवणाचा हा धमाकेदार कार्यक्रम ‘झी मराठी अवॉर्ड २०२३’, शनिवार ४ नोव्हेंबर, संध्या. ७ वा.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी / इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल