-
अभिनेता सुयश टिळक सध्या ‘अबोली’ मालिकेमुळे चांगलाच चर्चेत आहे.
-
‘अबोली’ मालिकेत सुयशने सचित राजेची भूमिका साकारली आहे.
-
पण सुयशने साकारलेली भूमिका सचितची असली तरी तो आतापर्यंत वेगवेगळ्या रुपात झळकला आहे.
-
कधी वृद्धाच्या रुपात तर कधी स्त्रीवेशात पाहायला मिळाला आहे.
-
आतापर्यंत सुयश ‘अबोली’ मालिकेत १० वेगवेगळ्या रुपात झळकला आहे.
-
पण या वेगवेगळ्या लूकमध्ये तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? याविषयी नुकतंच सुयशने सांगितलं.
-
सुयश म्हणाला, “मी १० मिनिटात तयार होऊन सेटवर जाण्यासाठी प्रसिद्ध आहे. मी एकदा सकाळी तयार झालो तर ब्रेक होईपर्यंत मला मेकअपची फार गरज भासत नाही. मुळात मला मेकअप करण्यात वेळ घालवण्याची सवय नाहीये. पण आता मला करावं लागतं.”
-
पुढे सुयश म्हणाला, “हा मेकअप करायला दीड ते दोन तास लागतात. त्यात चेहऱ्यावरती काहीना काही ट्राय केलं जात. त्याला वेळ लागतो. ते व्यवस्थित दिसत की नाही, हे पाहिलं जातं. त्यामुळे या सगळ्याला खूप वेळ जातो.”
-
“दीड-दोन तास मेकअपला दिलेला हा वेळ माझ्यासाठी खूप जास्त आहे. यानंतर पुन्हा जाऊन सीन करा. मग पुन्हा वेगळा लूक असेल तर तो बदला,” असा एकंदरीत अनुभव सुयशने सांगितला.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल